वाशीम: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वाशीम येथील एकमेव सिद्धिविनायक क्रेटिव्ह आर्ट या गणेश मूर्ती कार्यशाळेतील मुर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वाशीम येथील लाखाळा परीसरात सिद्धिविनायक गणेश मुर्ती कार्यशाळा असून गत १० वर्षापासून पर्यावरणपुरक शाडुच्या मुर्त्या बनविणारे मूर्तीकार सुदर्शन ताजणेकर आणि पल्लवी ताजणेकर दरवर्षी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळा महाविद्यालयात शाडु गणेश मुर्तीचे प्रशिक्षण देतात. मात्र यंदा, लॉकडाऊनमुळे माती व ईतर साहित्य वेळेवर उपलब्ध न झाल्याने मोजक्याच गणेश मूर्ती बनवू शकले आहेत. दरवर्षी या हंगामात जेवायलाही वेळ मिळत नाही परंतु यंदा मात्र कोरोनामुळे शासनाने गणेश मूर्ती बनविण्यासाठी निर्धारित केलेल्या निकषामुळे सर्वच चित्र पालटले असून या शेवटच्या दिवसांत मूर्त्यांवर अंतिम हात देणारे गणेश कार्यशाळेतील मूर्तीकार कारागीरही काहीसे गोंधळलेले आहेत.
व्हिडियो बातमी
दरम्यान या काळात गणेश मुर्त्यांची आगावु बुकिंग होत असते परंतु घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवावर लावलेल्या अनेक नियमामुळे मुर्ती कार्यशाळेतही कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे.
७ दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव आणि साहित्याची अनुपलब्धता यामुळे वाशीम येथील शाडु माती पासून बनविलेल्या गणेश मूर्तीची संख्या यंदा अत्यल्प दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यासह राज्यभरातून येथील शाडु गणेश मूर्तीना प्रचंड मागणी असते परंतु कोरोनामुळे दळणवळण बंद असल्याने मुर्तीकारांच्या कौशल्यपूर्ण हाताला आणि खिशालाही यंदा कात्री बसणार आहे म्हणून मूर्तीकारांचे नुकसान झाल्याचा सुर ऐकावयास मिळत आहे.
