वादळनामा: तौक्ते, निसर्ग, निलोफर वादळांच बारसे कुणी केले कुठुन आलीत ही नावे?
वत्सगुल्म लाईव्ह: सध्या अरबी समुद्रात तौक्ते हे चक्रीवादळ धुमाकुळ घालत आहे. भारतातील केरळ,तामीळणाडु, कोकण मुंबईसह संपुर्ण पष्चिम किनारपटटी झोडपुन काढल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमार्गे पाकीस्तानकडे कुच करीत आहे. याआधी आम्फान या चक्रीवादळाने कहर केला. अम्फानच्या आधी कटरीना, निवार, निसर्ग, हुदहुद, फानी बुलबुल हिकाका लैरी लीजा या वादळांमध्ये मोठ्याा प्रमाणात जीवितहानी व नुकसानीचा सामना करावा लागला होता. चक्रीवादळाच्या वेगवेगळ्या नावांमुळे ते चर्चेत येतात. जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आणि सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीचे बारसे कोन करते.. चक्रीवादळांचे नामकरण कसे आणि कुणामार्फत होते याबाबत अनेकांच्या मनात कृतुहुल नक्कीच असेल.
नावात काय आहे
शेक्सपिअर म्हणून गेला
नाव तुझे काय हे
ऐकण्यात मात्र जन्म आपला गेला
चक्रीवादळांच्या नामकरणामागे एक इतिहास दडलेला आहे. चक्रीवादळांची नावे ठेवण्यास अटलांटिक प्रदेशात 1953 च्या कराराने सुरुवात झाली तर हिंद महासागरी प्रदेशात ही प्रणाली वर्ष 2004 मध्ये सुरू झाली. भारताच्या पुढाकाराने या भागातील देशांनी वादळांना नावे दिली आहेत. या व्यतिरिक्त भारत पाकिस्तान श्रीलंका बांग्लादेश मालदीव म्यानमार ओमान आणि थायलंड या ८ देषांचा देखील चक्रीवादळांचे नामकरण करण्यामध्ये समावेश आहे. 2018 मध्ये युएई इराण कतार आणि येमेनसह अनेक देश या झोनमध्ये सामील झालेत. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं की हवामान खात्याकडून त्याचं नामकरण केलं जातं. वादळांना ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे.
यातली गंमतीची बाब म्हणजे, वादळाचं बारसे करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेत सुद्धा आहेत यासह वादळांचं बारसं करण्याची काही महत्त्वाची कारणंही आहेत. वादळ पुढे सरकताना देशादेशात माहितीची देवाणघेवाण होत असते. एकाच वादळाला जर विविध नावाने संबोधले गेले तर यंत्रणेमध्ये व्यवस्थापन करताना घोळ निर्माण होऊ शकतो. बऱ्याच अफवांना देखील ऊत येऊ शकतो. हे सगळं टाळण्यासाठी वादळ निर्माण होर्णाया व त्याच्या प्रभावाखाली येर्णाया भौगोलिक प्रदेशातील देश मिळून एखाद्या सांकेतिक नावाचा वापर करतात. त्याबद्दलही काही नियम आहेत. ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण होत असत. वादळांना नाव देण्याची सुरूवात तशी पाश्चिमात्य देशांकडून झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जायची परंतु काही महीला संघटनांच्या विरोधामुळे अमेरिका आता महीलांसह पुरुषांचेही नाव वादळाना देत असते. याबरोबरच प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावं देण्याचाही विचार असतो. नावं देताना कुणाच्या भावना दुखावनार नाहीत याची काळजी संबधीत देशाकडुन प्रामूख्याने घेतली जाते. एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो तेव्हा वादळ हे एकाच देशाचं न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार असावं असाही नियम आहे.
महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले. आपला भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये अर्थात उत्तर हिंद महासागरी प्रदेशात येतो. त्या त्या झोनमधील देशानी नावं सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळं येत जातील तसतशी अनुक्रमे येणा वादळांना द्यायची हा नियम आहे. भारतात २००४ सालात उत्तर हिंदी महासागरात येणाऱ्या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरु झाली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खात्याकडुन भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क केल्या जातो. त्यानंतर सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं.भविष्यात उद्भवणाऱ्या चक्रीवादळांचीअनेक राष्ट्र नावं निवडताना प्रख्यात अभिनेते अभिनेत्री, त्या त्या देशातील काही सुप्रसिद्ध अथवा बदनाम व्यक्तींची नावंही वापरतात.सर्वसामान्यपणे वादळांची विध्वंसकशक्ती त्यांचं बारसं करताना लक्षात घेतली जाते. त्यामुळे चक्रिवादळांच्या नावात काय आहे असं कुणी विचारलं तर त्यांना हा वादळनामा नक्की सांगा.
ही माहीती आपणांस कशी वाटली हे कॉमेंट सेक्सनमध्ये नक्की सांगा.
व्हिडियो बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/HRDUEP7YNBU


