सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करु-पालकमंत्री शंभूराज देसाई

·        कोविड -१९ उपाययोजना आढावा सभा

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोना बाधितांवर काळजीपूर्वक उपचार करण्यात येत आहे. ज्या बाधित रुग्णांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांना ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता नाही. सर्वांच्या सहकार्यातून आपण कोरोनावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. कोविड-१९ उपाययोजांचा आढावा घेण्यासाठी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणेखासदार भावना गवळीआमदार सर्वश्री ऍड. किरणराव सरनाईकअमित झनक,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत,पोलीस अधीक्षक वसंत परदेशीनिवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोडजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री देसाई म्हणालेरेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यात नियमितपणे मिळाले पाहिजे,यासाठी प्रयत्न सुरू आहे. इंजेक्शनचा अधिकचा कोटा जिल्ह्याला उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात बाधितांची संख्या कमी झाली असली तरी आगामी १५ दिवसात बाधितांचे प्रमाण आणखी कमी करावयाचे आहे. संपर्क कमीत कमी आला की ते शक्य होईल. पोलिसांनी संचारबंदी अंमलबजावणीची आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. तेव्हाच आपण दुसऱ्याला लाटेतून बाहेर पडू शकतो. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गावर आपले लक्ष असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणालेरेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा वाढविण्यासोबतच ऑक्सिजनच्या बाबतीत आपण लवकरच स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यातील नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प वेळेत सुरू होतीलअसे श्री देसाई म्हणाले.

खा. गवळी म्हणाल्यामानोरा येथे कोविड केअर सेंटर लवकर सुरू झाले पाहिजे. तिथे ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. रुग्णांना चांगले जेवण  उपचारादरम्यान उपलब्ध करून द्यावे. गावागावांमध्ये आरोग्य विभागाने पथक पाठवून गावकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात व परिसरात कायम स्वच्छता व साफसफाई असली पाहिजे. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था असावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. रुग्णाचे व त्यांच्या नातेवाइकांचे या काळात चांगले समुपदेशन होणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.

आ. झनक म्हणाले कीजिल्ह्यातील ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे,त्या रुग्णाला एक दिवस आड हे इंजेक्शन मिळत आहे. त्या रुग्णांना ते इंजेक्शन नियमित उपलब्ध व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले,ऑक्टोबरमध्ये दररोज तीनशे ते चारशे चाचण्या व्हायच्या. डिसेंबरमध्ये हे प्रमाण १ हजार चाचण्यापर्यंत गेले. सध्या सात दिवसात १८ ते २० हजार चाचण्या होत आहेत. जिल्ह्यात विषाणू चाचणी प्रयोगशाळेची क्षमता वाढल्यावर चाचण्यांची संख्या आणखी वाढेल. जिल्ह्यात अलीकडे बाधित रुग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरण मोहीम सुद्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. लसीकरणात अमरावती विभागात वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.आरोग्य विभागातील काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले,संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी २३ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांना ई-पासवर जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्याच्या सीमेवरील ६० ठिकाणी रस्ते संबंधित गावाच्या सहमतीने बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोविड-१९ च्या उपाययोजनांबाबत माहिती देतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले,जिल्ह्यात कोविड केअर सेंटर मध्ये ८९० खाटांची व्यवस्था आहे. ६२६ खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था,५१ खटांना एनआयव्ही व ३२ खाटांना बायपॅप मशीनची सुविधा आहे. वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे ७५ व ५० ऑक्सिजन खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाच्या निधीतून जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. वाशिम येथे दोन आणि कारंजा येथे एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प १५ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. वाशिम,मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव येथे प्रत्येकी एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे, असे डॉ. आहेर यांनी सांगितले.

१२५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात  आले आहेत. आणखी एक विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात १३१ लसीकरण केंद्र असून  आतापर्यंत ४५ वर्षांवरील सुमारे १ लाख ३५ हजार व्यक्तींना लस देण्यात आल्याची माहिती डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.

*****


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने