हॅपी फेसेस मालेगांव येथे जन्मष्टमीनिमीत्त आॅनलाईन वेशभुषा स्पर्धा संपन्न
वाशीमः ज्ञान,वैराग्य,सोंदर्य,शौर्य आणि करूणेचं प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्ण जन्मष्टमी निमीत्त हॅपी फेसेस द काॅंसेप्ट स्कुल मालेगांव येथे आॅनलाईन वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत चार महीन्यांपासुन शाळा बंद असल्याने शिक्षणाच्या आजवरच्या इतिहासामध्ये पहील्यांदाच मुलांना एवढया सुटृया मिळाल्या आहेत. परंतु असे असले तरी परिस्थतीचे वेळीच गांभीर्य ओळखुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळल्या जावे, वेळेचा सदुपयोग व्हावा या उदात्त हेतुने हॅपी फेसेस द काॅंसेप्ट स्कुलचे उपक्रमशील संचालक दिलीप हेडा यांच्या संकल्पनेतुन मार्च पासुनच लर्नींग फ्राॅन होमची अमंलबजावणी करीत शाळेने आॅनलाईन अध्यापन पध्दतीसाठी एक विषेश आज्ञावली विकसित केली असुन विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.हे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कृतीशिलतेला वाव मिळण्यासाठी अध्यापनासह विविध शैक्षणिक उपक्रमांचेही आयोजन या कालावधी दरम्यान करण्यात येत आहे. सर्व सामाण्य परिस्थिती असताना गोकुळष्टमी निमीत्त शाळेत विविध कार्यक्रम संपन्न होत असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा बंद असल्याने हॅपी फेसेस द काॅंसेप्ट स्कुल अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना वाव मिळण्यासाठी श्रीकृष्ण जन्मष्टमी निमीत्त राधा आणि कृष्णाच्या वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुर्वप्राथमिक ते वर्ग तीसरीच्या एकुण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन सुंदर अशा राधा आणि कृष्णाच्या वेशभुषेत विद्यार्थी सजले होते. यामध्ये एलकेजीमधुन राधा आणि कृष्णाच्या संयुक्त जोडीमध्ये प्रथम क्रमांक, प्रांजल बढे, शिवकन्या धोंगडे, व्दितीय क्रमांक वेदांत कोंघे, अर्थव बिडवे आणि तृतीय क्रमांक विपश्यना पाईकराव व राज खाडे यांनी पटकावीला तर युकेजीमधुन प्रथम क्रमांक धनश्री वर्मा व लोकेश जामकर, व्दितीय क्रमांक अर्थव बोरकर व भावीका दहात्रे तर तृतीय क्रमांक अर्थव बोरकर व समृध्दी ढवले या जोडींनी पटकाविला तर पहील्या वर्गामधुन आर्या जाधव आणि श्रावण धोतकर, व्दितीय, भक्ती रोकडे आणि सोहम गौरकर, तृतीय श्रेयश कांबळे व आश्लेशा बढे यांनी पटकावीला. दुसऱ्या वर्गामधुन प्रथम क्रमांक मंजीरी मोरे, भाग्येश मनटकर, व्दितीय संस्कृती काळे व साईकुमार आडे, तृतीय आरोही वानखेडे व आर्या जाधव यांनी मिळवला तर वर्ग तीनमधुन पहीला क्रमांक स्वरूप घुगे व दर्शिका सरनाईक, व्दितीय प्राची कड व गौरव राठी, तर तृतीय क्रमांक समृध्दी शर्मा व आयुश इंगळे या राधा कृष्णाच्या जोडीने पटकावीला असुन शाळेचे प्राचार्य मिलींद लाहोटी, उपप्राचार्य विठठल गौरकर, समन्वयीका ममता जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना डिजीटल प्रमाणपत्र देवुन गौरव केला. दरम्यान सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षीका स्मिता ओझा, वसुधा पिंपरकर, प्रज्ञा बोरकर,राखी गट्टाणी आणि पायल गोरे यांनी परिश्रम घेतले.
