जिल्ह्यातील 30 अंगणवाड्यासाठी 2.55 कोटी
खासदार भावनाताई गवळी यांनी आणला निधी
वाशीम: जिल्ह्यातील ग्रामीण भागात चिमुकल्याच्यांच्या अंगणवाड्यासाठी खासदार भावनाताई गवळी यांनी निती आयोगाकडे निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत निती आयोगाने वाशीम जिल्ह्य़ातील 30 अंगणवाड्यासाठी 2.55 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात अनेक गावात चिमुकल्यांच्या अंगणवाडीसाठी इमारतीची सोय नाही. काही ठिकाणी झाडाखाली अंगणवाडी भरते ही बाब लक्षात घेऊन खासदार भावनाताई गवळी यांनी निती आयोगाकडे अंगणवाडीसाठी निधीची मागणी केली होती. पाठपुरावा केल्याने निती आयोगाने जिल्ह्यातील 30 अंगणवाड्यासाठी 2.55कोटी रूपये मंजूर केले आहेत.
यामधे वाशीम तालुक्यातील सुपखेला, साखरा, आसोला जहा,तोंडगाव
मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा बु., जांब, साळंबी,मानोली, कंझरा
मानोरा तालुक्यातील : अजनी, तोरनाळा, देउळवाडी, शिवनी, रणजीतनगर, चोंडी
कारंजा तालुक्यातील अंर्बोडा
मालेगाव तालुक्यातील : जउळका, डव्हा, गिव्हा कुटे, सिरसाळा मिनी
रिसोड तालुक्यातील चिंचाबा, नंधाना, तांदुळवाडी, केनवड, कोयाळी बु., तपोवन, व्याड, जायखेड, रिठद 1, रिठद 2 या गावांचा समावेश आहे यामधे
प्रती अंगणवाडी बांधकामासाठी 8.50 लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. 30 अंगणवाडीसाठी एकुण 2 कोटी 55 लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
जवळजवळ एका वर्षापासुन खासदार भावनाताई गवळी यांनी पाठपुरावा केला होता.अखेर कामाला मंजुरात मिळाली आहे.या कामाची प्रशासकीय प्रक्रिया होऊन एक ते दिड महिन्यात कामे प्रत्यक्षात सुरू होतील. या निधीमुळे ग्रामीण भागातील चिमुकल्याच्या डोक्यावर छत मिळणार आहे