राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती.

मोठी बातमी

राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती.
चंद्रपूर, १५ ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून व्यवसाय आणि व्यापार ठप्प आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक बाबींमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली आहे. अशात आता राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा आणि कोचिंग पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कोविडचे सर्व नियम पाळून राज्यात एसटी सेवा सुरू करणार येणार असून एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करण्याची तयारीही सरकार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने