सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई उलेमाले यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
दरम्यान ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर वाशीम शहरातील विविध वसाहतीमध्ये मिनाताई उलेमाले मित्र मंडळानी निर्जंतुकीकरण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आवाहन केले आहे. लॉकडाऊन काळात युथ फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजनासह गरजूंना धान्य व किराणा किट वाटप करून मिनाताईनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यावर वाशीम जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यामुळे परीसर निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान स्वतः हातात पाईप घेऊन परीसर सॅनिटाईज करनाऱ्या मिनाताईंच्या कार्याचे पंचायत समिती सभापती रेश्मा गायकवाड यांनी कौतुक करून त्यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी अखिलेश उलेमाले,प्रा.कैलास खासभागे, विशाल कालापाड, गजानन इंगोले, ऋषिकेश उलेमाले, महेश जाधवसह गोपाल कवर यांची उपस्थिती होती.