लोणार येथील दुर्गा टेकडी विकासाच्या नावाखाली गिळंकृत होवु देऊ नका.
३४ वर्षांपासून वृक्ष संवर्धन करनाऱ्या मापारी यांची आर्त हाक
लोणार(वत्सगुल्म लाईव्ह) उल्कापातामुळे हजारो वर्षांपुर्वी निमार्ण झालेल्या सरोवरामुळे बुलडाणा जिल्हयातील लोणार शहराला जगभर ओळख आहे. दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक लोणारला भेट देतात. लोणार सरोवर जरी एक नैसर्गिक आश्चर्य असलं तरी याच सरोवराच्या पुर्वेला अजुन एक मानव निर्मीत आश्चर्य पाहायला मिळतं. साधारणतः १२० एकरात विस्तीर्ण असेलेली उंच टेकडी दुर्गा टेकडी म्हणुन प्रसीध्द आहे. ३४ वर्षांपुर्वी हया वृक्षहीन भुंड टेकाड जीमणीवर पालवी लावण्याच काम लोणारेतील पुंडलीकराव मापारी यांनी हाती घेतले, केवळ निसर्ग व्यासंगाच्या ध्यासाने झपाटलेल्या पुंडलीकरावांनी आपले घरदार,कुंटुुंब आणि वैभव संपन्न जिवनाचा त्याग करून तब्बल ३४ वर्षे याच दुर्गा टेकडीवर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले.
अगोदरच पाणी टंचाई आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या लोणारेत टेकडीवर झाडे जगवण्याच आवाहन पेलुन दुरवर असलेल्या विहीरीवरून पाणी आणुन झाडांना जगवले. विशेष बाब म्हणजे गेल्या तीस वर्षात त्यांनी एकदाही टेकडीची पायरी खाली उतरली नाही. नातेसंबंध सोडून ते वृक्ष वन्यजीवांना सर्वस्व मानून विरक्त जीवन जगत आहेत. एकेकाळी ओजाड असलेली ही टेकडी आजमितीला वेगवेगळया प्रजातींच्या वृक्षांनी बहरून लोणार शहरात येणाऱ्यांचं जणु स्वागतच करत आहे.
दरम्यान आज घडीला हजारो प्राणी आणी पक्षांचा राबता असलेल्या या मानव निर्मीत नंदनवणावर भौतिक विकासाच्या नावाखाली शासनाच्याच काही संस्थाचा डोळा असुन पुंडलिक मापारी यांनी फुलवीलेल्या या नंदनवणाला गिळंकृत करण्याचा घाट घातला जात आहे.
दरम्यान, विकासाला मापारी यांचा विरोध नसून दुर्गा टेकडीवरील वृक्षसंपदा नष्ट करून ‘Destruction’ करून कोणतेही ‘Construction' करू नये यासाठी पुंडलीक मापारी यांनी काही वर्षापूर्वी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने निर्माणाधिन प्रकल्पामध्ये एमटीडीसी अर्थात पर्यटन विकास महामंडाळाने २ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या आश्वासन पत्रामध्ये दुर्गा टेकडीच्या कंपाऊंड वाॅलच्या आतील भागामध्ये पदपथ आणि तत्सम विकास प्रकल्पांसाठी कोणतीही वृक्षतोड करणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते परंतु मागील वर्षभरात दुर्गा टेकडीच्या पायथ्यालगत तब्बल १० एकर जमीनीवरील वृक्षतोड केली आहे.
दरम्यान, वृक्षरोपणासाठी १३ आणि ३३ कोटीच्या कागदी योजनांचा दांडोरा पिटणाऱ्या राज्य शासनाला उपलब्ध असलेली सवंर्धित वनसंपदा तोडण्याची कुबुध्दी सुचतेच कशी याबद्दल गेल्या ३४ वर्षांपासुन वसुंधरेची निस्वार्थ सेवा करनाऱ्या पुंडलीक मापारी यांनी चिंता व्यक्त केलीय.
दुर्गा टेकडीला वाचवीण्यासाठी त्यांनी देशभरातील पर्यावरण व निसर्ग व्यासंगी व्यक्ती आणि संस्थाना निसर्गाचा हा मानव निर्मीत ठेवा टिकवण्यासाठी पुढे या असे भावनिक आवाहन केलय. तर, यापुढे भौतीक विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल तर दुरच झाडाच्या पानाला जरी हात लावाल तर विविध पर्यावरणप्रेमी संस्थांना सोबत घेऊन राज्यभर जन आंदोलन करण्याचा ईशारा मराठा सेवा संघासह विविध पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
हेडलाईन