वाशीममध्ये या २५ ठिकाणी होणार श्रींचे विसर्जन न.प.वाशीमची विशेष व्यवस्था

 वाशीममध्ये या २५ ठिकाणी होणार श्रींचे विसर्जन न.प.वाशीमची विशेष व्यवस्था

वाशीम: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन यंदा गणेश  विसर्जण मिरवणुक प्रशासनाने रद्द केली त्यामुळे बाप्पांच्या विसर्जनासाठी वाशीम नगर परिषदेअंतर्गत विषेश व्यवस्था करण्यात आली आहे. वाशीम शहारातील विविध प्रभागामध्ये २५  ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली असुन यामध्ये नवीन रिसोड नाका, श्री हनुमान मंदिर(काळे फैल), गोंदेश्र्वर (गोंदेश्वर पुलावर), राजस्थान कॉलेज परिसर, वाटाणे वाडी(अकोला रोड) , डॉ. आंबेडकर भवन(नालंदा नगर), श्री गजानन महाराज चौक (सिव्हिल लाईन), पाटणी लेआऊट (खोडे माऊली नगर),  श्री महाकाली मंदिर परिसर (जुनी आयू.डी.पी काॅलनी),  पुसद नाका,  हिंगोली नाका, जुगलकिशोर मालपाणी यांच्या घरासमोर अर्थात इंदीरा चौक,शुक्रवार पेठेतील परळकर चैक, राजणी चैक, श्री करूणेश्वर रोडवरील जुन्या बालाजी मंदिरा जवळ, टिळक चौक, चंडीका वेशेतील श्री सावतामाळी मंदिरा जवळ, नीमजगा चौक, श्री विठ्ठल मंदिर(देवपेठ), गुरुवार बाजार, मंत्री पार्कमधील डॉ बाजड यांचे हॉस्पिटल जवळ, पाटणी चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक , नगर परिषद कायार्यलया जवळील अग्निशमन कार्यालय परिसरामध्ये आणि जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या कृत्रिम तलावात नगर परिषदेच्यावतीने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या नजीकच्या संकलन स्थळी स.७  ते रात्री ९ पर्यंत मुर्ती आणुन द्याव्यात असे आवाहन नगर परिषदेने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

Video News: वाशीममध्ये या २५ ठिकाणी होणार श्रींचे विसर्जन न.प.वाशीमची विशेष व्यवस्था

दरम्यान, वत्सगुल्म नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक  हेडा यांचा कोरोना चाचणी अहवाल बाधीत आल्याने ते गत काही दिवसांपासुन गृह विलगीकरणात आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी शहरवाशीयांना आवाहन केले की, ‘माझी कोरोना चाचणी बाधीत आल्याने आपल्या समवेत सार्वजनिक गणेश उत्सवाकरिता उपस्थित राहू शकणार नाही. नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून तसेच सामाजिक व शारीरिक अंतर ठेवूनच गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडावा, सर्वांनी मास्क वापरावा व गर्दी टाळुन श्रींचे विसर्जन शांततेत पार पाडावे, नगरपरिषदेच्या वतीने शहरातील गणपती विसर्जनाकरिता निर्धारित केलेल्या २५ ठिकाणी शहरातील नागरिकांनी तसेच गणेश भक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणपतीच्या मुर्त्या आणून द्याव्या अशी विनंतीही नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने