एकबुर्जी सांडव्यातील धबधब्यावर तुफान गर्दी, गर्दीवर नियंत्रण गरजेचे


वाशीम: शहराची लाईफलाईन असलेला आणि पैनगंगेच्या पात्रात वसलेला एकबुर्जी प्रकल्प अलीकडे पडलेल्या सततधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. 
सांडव्यातुन वाहणाऱ्या पाण्यामुळे येथील मीनी धबधबा जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरत असून लॉकडाऊनच्या कचाट्यातून नुकतीच सुटका झालेले वाशीमकर आणि परिसरातील मंडळी सुट्टीच्या दिवशी येथील विहंगमय निसर्ग आणि सांडव्यातुन निर्माण होणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
सुट्टीच्या दिवशी प्रकल्पावरील धबधब्यावर परीसरातील नागरीकांची प्रचंड गर्दी पाहता कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने वेळीच उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने