कोजागिरी पौर्णिमे निमित्त वाशिम येथे निशुल्क दमा औषधीचे वितरण
वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या आशिष फार्मसी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत रविवार बाजार येथील आशिष फार्मसी मध्ये दमा रुग्णांकरीता लाभदायक असलेल्या निशुल्क आयुर्वेदिक औषध वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोजागिरी पौर्मिणेला दमा औषध घेण्याला विशेष महत्व असल्याने याचा लाभ दमा आजाराने ग्रस्त असलेल्यांना मिळावा या सामाजिक भावनेतून आशिष ठाकुर यांच्या वतीने दरवर्षी कोजागिरी पौर्णीमेला औषधीचे निशुल्क वितरण केले जाते. या उपक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून शेकडो दमा रुग्ण याचा लाभ घेत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर शासनाने जारी केलेल्या साथरोग नियमाचे पालन करुन, सामाजीक अंतर पाळून व मास्कचा वापर करुन शहरासह जिल्हयातील दमाग्रस्त रुग्णांनी या निशुल्क औषध वितरण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आशिष ठाकुर यांनी केले आहे.

