(वाशीम: दि.३०) शेतकरी संघर्ष संघटनेच्या शाखेचे श्रिगीरी येथे संस्थापक अध्यक्ष माननीय राजूभाऊ वानखेडे व जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ अढाव यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत संदीप चिखलकर, जिल्हा संघटक अनिल काठोळे, मालेगाव तालुका उपाध्यक्ष गणेश मुके, विजय गोरे, कळमनुरी नगर पंचायत कर्मचारी डाखोरे आदिजन हजर होते.
याप्रसंगी बोलताना अढाव यांनी संघटनेची ध्येय धोरणे व कार्य विस्तृतपणे मांडतानाच शेतकरी बांधवांनी स्वतचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी व हक्क मिळविण्याचा संघर्ष करणयासाठी संघटनेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच वेळोवेळी संघटनेच्या वतीने शेतकरयांसाठी होणारया आंदोलनात मोठ्या सन्खेने सामील होण्याचे आवाहन केले. वानखेडे यांनी संघटना स्थापनेमागची भुमिका विषद करुन जिल्ह्यातील शेतकरयांसाठी हक्काची संघटना उपलब्ध करुन दिली आहे. ही केवळ आमची नाही तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची संघटना असल्याचे सांगितले. काठोळे यांनीही प्रास्ताविकपर विचार मांडले.
यावेळी शाखाध्यक्ष संतोष कव्हर शाखा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगोले, संघटक, गणेश भाऊ डाखोरे, संपर्कप्रमुख गजानन भाऊ (डाखोरे सरपंच), रवि डाखोरे गजानन डाखोरे, गणेश डाखोरे, सदिप डाखोरे, ज्ञानेश्वर डाखोरे, कैलास डाखोरे अदिजनंची निवड करून शाखा उद्घाटन कार्यक्रम पार पडला याप्रसंगी सोमठाना व श्रिगीरी येथील कार्यकर्ते व शेतकरी मंडळी बहुसंखेने उपस्थित होती.