वत्सगुल्म लाईव्ह: वाशिम जिल्ह्यातील 163 पैकी 11 ग्रामपंचयाती हया निवडणुकीपुर्वीच बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरीत 152 ग्रामपंचायतीच्या निकालाची मतमोजणी प्रक्रीया आज तालुकास्तरावर पार पडली ज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सत्ताबदल झाल्याचे या निकालातुन स्पष्ट झाले आहे.
वाशीम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळख असलेल्या अनसिंग ग्रामपंचायती मध्ये परिवर्तन पॅनलने 17 पैकी 15 जागी विजय मिळवित विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांच्या ग्रामविकास पॅनलचा पराभव केला तर कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायती मध्ये भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलने 17 पैकी 14 जागा जिंकुन विजय मिळवला आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला धक्का देत 13 पैकी 7 जागेवर विजय मिळवीला आहे तर मालेगांव तालुक्यातील बहुचर्चीत शिरपूर ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेच्या पॅनलने काँग्रेसच्या पॅनलला धक्का देत 17 पैकी 12 जागेवर विजय मिळवला तर वाशीम तालुक्यातील काटा या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आणि काॅंगेसच्या पॅनलमध्ये शेवटपर्यंत काटयाची टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान दोन्ही पॅनलला 5-5 अशा समान जागा मिळाल्याने ईश्वर चिठठीच्या साहायाने निकाल लावण्यात आला.
मालेगाव तालुक्यातल आदर्श ग्राम म्हणुन ओळख असलेल्या ढोरखेडा येथील निकालाकडे सर्वच जिल्हावाशीयांचे लक्ष लागुन होते एकुण 7 सदस्य संख्या असलेल्या ढोरखेडा ग्रामपंचायतीमध्ये स्व.शंकरराव मिटकरी यांच्या पॅनलने 4 जागा जिंकत सत्ता कायम राखण्यात यश मिळवून विरोधी एकता पॅनलचा पराभव केला. मानोरा तालुक्यातील कुपटा ग्रामपंचायतीमधुन ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 6 जागेवर विजय मिळवीला आहे.
तर वाशीम तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या वारा जहांगीर येथील ग्रामविकास परिवर्तन पॅनलने 11 पैकी 11 जागा मिळवत सत्ताधारी राजु पायघन यांच्या पॅनलचा दारुण पराभव करीत वारा जहांगीरमध्ये सत्ता परिवर्तन घडवुन आनले तर पार्डी आसरा येथे परशराम ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या शेतकरी शेतमजुर ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 7 जागा मिळवत विजयश्री संपादन केली आहे.
वाशीम जिल्हयातील नोकरदारांचे गाव म्हणुन प्रसीध्द असलेल्या ब्रम्हा ग्रामपंचायतीमध्ये संदीप मुसळे यांच्या जय सहकार पॅनलने 9 पैकी 8 जागावर विजय मिळवला आहे तर वारला ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 9 जागा जिंकत गजानन मस्के यांच्या ग्रामविकास पॅनलला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे.
वाशीम तालुक्यातील बहुचर्चीत असलेल्या पार्डी टकमोर ग्रामपंचायतीमध्ये राजुभाऊ चौधरी, मोहन चौधरी व श्याम देवळे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या ग्रामविकास पॅनलनला 9 पैकी 5 जागेवर यश मिळाले तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर यांनी तामसी या गावात 11 पैकी 9 जागा जिंकुन आघाडी मिळवली आहे.
वाशीम जिल्हयातील कब्बडडीची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या कळंबा महाली या गावात बाबुराव महाले, बंडु महाले आणि डाॅ.भागवत महाले यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलने 11 पैकी 11 जागा जिंकत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवीला तर पिंपळगांव डाक बंगला येथे दंडे आणि पांढरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 7 जागा जिंकुन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. हा होता जिल्हयातील काही महत्वाच्या ग्रामपंचायतीचा संक्षीप्त आढावा तर वाषीम जिल्हयातील पक्षीय बलाबलामध्ये शिवसेना 30, राष्ट्रवादी काॅंगेस-24, काॅंग्रेस 25, भाजपा 10 तर मनसे पुरस्कृत 1 सदस्य निवडुन आल्याचा संबधीत पक्षानी दावा केलाय तर जिल्हयातील उर्वरीत स्थानिक व अपक्ष गटामधुन 73 उमेदवार विजयी झाले आहेत.
तुर्तास विविध गावात अनेक पॅनलने विजय मिळवीला असला तरी सत्ता स्थापनेचे खरे चित्र सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे सरपंच पद कुणाच्या पारडयात पडणार याबाबत गावकऱ्यांमध्ये उत्सुकता निमार्ण झाली आहे.
मित्रांनो, निवडणुक असो वा खेळ यामध्ये स्पर्धा आलीच आणि स्पर्धा म्हटले तर यामध्ये कुणाचा तरी जय किंवा पराजय हा ठरलेलाच असतो त्यामुळे निवडणुकांच्या या काही दिवसांमध्ये विविध गावांचे वातावरण अक्षरक्षः ढवळुन निघाले, हसले दुरून कोणी वा जवळुन घात केला असही बहुदा काहींच्या बाबतीत झाल असेल निवडणुका असो वा कोणतीही स्पर्धा नक्कीच आपण खेळ भावनेनेच घेतल्या पाहीजेत. या मागील चार दोन दिवसात आपल्यामध्ये निमार्ण झालेल्या विरोधी भावनेला येथेच निरोप देवुन आपल्या गावाच्या विकासासाठी एकसंघ होवुन काम करण्याचा संकल्प आपण करून लोकशाहीच्या पर्वाचे आणि जनता जनार्दनाच्या आदेशाचे स्वागत करूयात. जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन आणि पराभुतांनाही शुभेच्छा.