माझी वसुंधरा निबंध स्पर्धेत हॅपी फेसेसच्या प्रेरणा अवचारचे सुयश


वाशीमः नगर परिषद वाशीम आयोजित माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आयोजित भव्य निबंध स्पर्धेत हॅपी फेसेसमधील वर्ग ४ च्या कु.प्रेरणा किरणकुमार अवचार या विद्यार्थिनीने वर्ग १ ते ४ या गटामध्ये व्दितीय क्रमांक पटकावीला असुन हॅपी फेसेसचे प्राचार्य सिध्दार्थ चौबे, समन्वयक अभिजित पाठक आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये शाळेमध्ये प्रेरणाचा सत्कार करण्यात आला. 
दरम्यान, निसर्गाशी असलेली कटीबध्दता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी  संबधीत पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वार पर्यावरण व वातावरण बदल होणे हेतु माझी वसुंधरा या  अभियाना अंतर्गत शासनामार्फत विविध उपक्रम राबवीले जात आहेत. पृथ्वीतत्वाशी संबधीत वनीकरण, वनसंवर्धन,घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमीनीच्या धुपीकरण, पृथ्वीच्या आवरणातील विविध प्रदुषण, नदी संवर्धन, वन्यजीव संवर्धन , उर्जेचा अपव्यय इत्यादी पर्यावरणीय संकल्पनेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हे उददीष्ट डोळयासमोर ठेवुन नगर परिषद वाषीम अंतर्गत दिनांक १ ते २५ डिसेंबर दरम्यान भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये वर्ग १ ते ४ या गटासाठी असलेल्या स्वच्छता एक सवय या विषयावर प्रेरणा अवचार या विद्यार्थीनींने स्वच्छतेशी निगडीत असलेल्या मुलभुत गोष्टी आणि दैनंदिन जीवनतील विविध उदाहरणे व  दाखले देत उत्कृष्ट लेखन केले.
कोरोनासारख्या सूक्ष्म जिवाणूने मानवी जीवन ग्रस्त झाले असून  स्वच्छता ही फक्त हात धुण्यापुरतीच मर्यादित न राहता दैनंदिन जिवनात तीचा अवलंब नेहमी झाला पाहिजे या आशयावर आधारित प्रेरणाने आपल्या विषयाचे सादरीकरण करून एकुण ५० पैकी ३६  गुण मिळवत या निबंध स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावीला यावेळी हॅपी फेसेस द काॅंसेप्ट स्कुलचे संचालक दिलीप हेडा, कवीता हेडा यांनी विजयी विद्यार्थीनीला शुभेच्छा देवुन कौतुक केले. यावेळी प्राचार्य सिध्दार्थ चौबे समन्वयक अभिजीत पाठक आणि पालकांची उपस्थीती होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने