वाशीम जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी
ज्येष्ठ साहित्यिक ना.चं कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
वाशीम: साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, कादंबरीकार, कथाकार, कवी, स्तंभलेखक, नॅशनल बुक ट्रस्ट चे सदस्य व बालभारतीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक 'राघववेळ'कार नामदेव चं कांबळे यांना २०२१ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणाऱ्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा आज सोमवारी ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान आणि अभियांत्रिकीस, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, साहित्य, शिक्षण, क्रीडा, सिव्हिल सर्व्हीस यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
यंदाच्या २०२१ सालासाठी एकुण ११९ जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये १० परदेशी नागरिकांचा, १६ मरणोत्तर तर एक तृतीयपंथी व्यक्तीला पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून एकुण सहा जणांना हा पुरस्कार जाहीर झाला असून वाशीम येथील ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मुळचे वाशीम जिल्ह्यातील शिरपूर या गावचे सुपुत्र असलेले साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे हे वाशीम शहरातील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वीही त्यांना १९९५ मध्ये 'राघव वेळ' या कांदबरी साठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दरम्यान साहित्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जिल्ह्याला जाहीर झाल्याने वाशीम जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
नामदेव कांबळे यांचे साहित्य
- राघव वेळ(कादंबरी)
- अस्पर्श(कादंबरी)
- ऊन सावली(कादंबरी)
- मोराचे पाय(कादंबरी)
- सांजरंग(कादंबरी)
- सेलझाडा(कादंबरी)
- बळी (कथासंग्रह)
- क्रुष्णार्पण (कादंबरी)
- झाकोळ (कादंबरी)
- परतीबंद(कथा संग्रह)
- सिध्दार्थ (ललीत-लेख)
- अकल्पित (कविता संग्रह)
- पत्यय (कविता संग्रह)
- तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
- गहीवर (कविता संग्रह)
- स्मरण विस्मरण (लेख संग्रह)
- आपले दादा- दादासाहेब हावरे(चरित्र)
- शब्दांच्या गावा जावे(भाषणे) मिळालेले पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार १९९५ - 'राघव वेळ' साठी
- ह.ना. आपटे पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- बा.सी. मर्ढेकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- वि.स. खांडेकर पारितोषिक १९९८ - 'ऊन सावली'साठी
- विविध संस्थांचे पुरस्कार- 'राघव वेळ','ऊन सावली','सांजरंग', 'मोराचे पाय', 'क्रुष्णार्पण'
- राघव वेळचा बंगाली अनुवाद- 'रघबेर दिनरात'(२००९)मध्ये प्रकाशित -तिला २०११-१२ चा साहित्य अकादमी
- राज्य पुरस्कार 'राघव वेळ'(१९९४) ,'ऊन सावली'(१९९६)
- वैयक्तिक पुरस्कार- संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार,मुंबई,सामाजिक एकता पुरस्कार,मुंबई,अण्णा भाऊ साठे पुरस्कार-महा.राज्य,मुंबई, समाज भुषण पुरस्कार,नांदेड, जीवन गौरव पुरस्कार,डाॅबाआंमविद्यापीठ,औरंगाबाद२०१८,रायटर्स रेसिडेंस फेलोशिप-'साहित्य अकादमी '(२००९)
मनापासुन खूप खूप अभिनंदन...सर
उत्तर द्याहटवा