आनंद मेळाव्याचा वाशीमकर लूटत आहेत आनंद


(व.टा) महीला आर्थिक विकास महामंडळ, लोकसंचालीत साधन केंद्र जिल्हा अकोला आणि पंडीत दिनदयाल राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत वाशीम येथील जिल्हा क्रिडा संकुलनावर भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन दिनांक ९  जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलय. दरवर्षी बालासाहेब यात्रोत्सवा दरम्यान वाशीम शराहामध्ये भरणारा हा आनंद मेला यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाल्यामुळे जिल्हा क्रिडा संकुलनावर आयोजित केला आहे. लाॅकडाऊन काळात सृटटीचा आनंद न घेवु शकणारे वाशीमकर नागरिक आणि बच्चे कंपनी या मेल्यातील विविध साहसी खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.


 दरम्यान, कोरोनाच्या खबरदारीमुळे मास्क लावलेल्या मोजक्याच लोकांना सॅनिटाईज करून आतमध्ये प्रवेश दिला जात  आहे. आनंद मेल्यातील प्रत्येक खेळण्याची दररोज सॅनिटाईजने स्वच्छता केली जात असून कोरोना संदर्भात विशेष खबरदारीही घेण्यात येत आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत हा चालत असलेल्या या आनंद उत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्क व सोशन डिस्टंशिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन आनंद मेळावा व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने