बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 2010 पासून ची 16462 पदे भरण्याची भारतीय अस्मिता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माव्हारे यांची मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 2010 पासून ची 16462 पदे भरण्याची भारतीय अस्मिता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माव्हारे यांची मागणी

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकाने अनुसूचित जमातीची पदे गेल्या 2010 पासून रिक्त ठेवली  आहेत हा एक प्रकारे अनुसूचित जमाती वर अन्यायच होय , या संदर्भात भारतीय अस्मिता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष याने माहितीचा अधिकारानव्ये माहिती माघली असता , सयाजी सांमळे, किर्तीकांत परमार, पूजा तावडे यांच्या खंडपीठाने हि माहिती दिली असून 2010 पासून ते 2021 पर्यंत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम  महानगरपालिका अंतर्गत अनुसूचित जमातीची  उपअभियंता, प्रभारी अभियंता, परिविक्षाधीन अधिकारी, संख्याकी अधिकारी , प्रोगामर , कनिष्ठ अभियंता, बसचालक, बसवाहाक, तारतंत्रि, शिपाई , या प्रकारे  केवळ अनुसूचित जमाती ची  वर्ग 2 , वर्ग 3 व वर्ग 4 ची सुमारे 16463 विविध पदे रिक्त आहेत, हि पदे 2010 ते 2021 पर्यंत ची असून  2000 पासून ची पदे पदे रिक्त असू शकतात यामुळे निश्चित हि पदसंख्या जास्त देखील असू शकते. हि पदे 2010 वर्षी 2352 एवढी रिक्त आहेत,, 2011 वर्षी 2224 पदे रिक्त आहेत.

2012 मध्ये 1961 पदे रिक्त आहेत,, 2013 मध्ये 1155 पदे रिक्त होती,,2014 मध्ये 1214 पदे रिक्त होती,, 2015 मध्ये 1185 पदे रिक्त होती,, 2016 मध्ये 1172 तर 2017 मध्ये 1212 पदे रिक्त होती,, 2018 मध्ये 1280 पदे हे रिक्त होती तर 2019 मध्ये 1279 पदे रिक्त होती 2020 मध्ये 1373 पदे रिक्त आहेत तर 2021 मध्ये 65 पदे रिक्त आहेत  एवढे पदे हे केवळ अनुसूचित जमातीचे असून ती आतापर्यंत भरले गेलेले नाहीत हा एक प्रकारे आदिवासींवर अन्याय आहे असा अन्याय सर्व जाती जमातीवर झालेला असू शकतो  ही सदरील पदे लवकर भरावी असे आवाहन भारतीय अस्मिता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माव्हारे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केले आहे.या प्रकारे सर्वच SC,ST,VJ  ओपन, OBC ची पदे रिक्त असतील त्यावर देखील भारतीय अस्मिता पार्टी लक्ष केंद्रित करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Video 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने