जाता जाता धो धो कोसळला श्रावण, एकबुर्जी ,संगमेश्वर व वाडीचा मारोती येथे पर्यटकांची कूच


वाशीम: श्रावणारंभी दडी मारणाऱ्या वरूणराजाने श्रावणाच्या उत्तरार्धात मात्र धो धो बरसायला सुरूवात केलीय. गत दहा दिवसांपासुन वाशीम  जिल्हयामध्ये सर्वदुर पाऊस कोसळत असुन जिल्हयातील नदी,नाले आणि जल प्रकल्प ओसंडुन वाहत आहेत. दरम्यान, वाशीम  तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यातुन निर्माण होणारा धबधबा कित्येक वर्षानंतर खळखळुन वाहत असल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. तर तिकडे नव्यानेच निर्मित पंढरीनाथ सागर म्हणुन प्रसिध्द असलेला वारा जहांगीर येथील पुस नदीच्या पात्रात असलेला संगमेश्वर प्रकल्पही तुंडुब भरल्याने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.


 वाशीम तालुक्यातील पंचकोशिचा पहारेकरी म्हणुन प्रसीध्द असलेल्या वाडीचा मारोती येथील जल प्रकल्पात देखील पुरेसा साठा निमार्ण होत असुन शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत असून जाता जाता श्रावणाने जलस्त्रोत भरल्याने वाशीम तालुक्यातील एकबुर्जी येथील धबधबा, वारा जहांगीर येथील  संगमेश्वर जल प्रकल्प व वाडीच्या मारोती परीसरातील विहंगमय दृश्य पर्यटकाचे आकर्षण ठरत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने